आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे.जिथे शिक्षक सक्षम नाही, मुलांची संख्या खुप आहे किंवा शिक्षकांची योग्य संख्येत उपलब्धता नाही आणि जेथे विद्यार्थी शिक्षकांशिवाय स्वतंत्रपणे शिकूइच्छितो अशा परिस्थितीत व्हर्च्युअल लर्निंग म्हणजेच आभासी शिक्षण खूप मदतीचे ठरते. या माध्यमामुळे आपल्या गरजेनुरूप दृक्श्राव्य कार्यक्रमाद्वारे स्वशिक्षण करणे सहज शक्य होते.

पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत, शिक्षक शिकवीत असलेल्या स्थळी आणि वेळीच, विद्यार्थ्याने उपस्थित असणे आवश्यक असते. कुठल्याही कारणामुळे, जर विद्यार्थी त्याच स्थळी आणि वेळी उपस्थित राहू शकत नसेल, तर तो शिक्षण घेऊ शकत नाही. उपस्थित विद्यार्थ्याची सुद्धा त्या वेळी शिक्षण घेण्यास पोषक मानसिकता नसेल, तरीदेखील तो शिक्षण घेण्यास मुकतो. व्हर्च्युअल लर्निंगमुळे स्थळ काळाची ही बंधने गळून पडतात. अशा पद्धतीच्या व्हर्च्युअल लर्निंग किंवा ई लर्निंग मुळे प्रत्येक विद्यार्थी, त्याला सोयीच्या असलेल्या स्थळी आणि वेळीशिकू शकतो. व्हर्च्युअल लर्निंगद्वारे विद्यार्थ्याला दूरवरच्या शिक्षकांशी, तंज्ज्ञांशी थेट संपर्क साधता येतो. या माध्यमातून परस्पर संवादातून शंकांचे निरसन करता येते, विषय समजावून घेता येतात.आतापर्यंत शिकू शकत नसलेल्या खूप मोठ्या विद्यार्थी संख्येस शिक्षणव्यवस्थेत आणण्यास ही “स्थळ काळाची लवचिकता” आवश्यक व सक्षम आहे. साहजिकच, “व्हर्च्युअल लर्निंग किंवा ई लर्निंग” मुळे शिक्षणाची उपलब्धता भरपूर वाढली आहे.

ई लर्निंग मुळेस्थळ, काळाची बंधने पाळणे शक्य नसणारा विद्यार्थी देखील शिक्षणव्यवस्थेत येऊ शकतो, तसेच कमी आणि उच्च क्षमतेच्या विद्यार्थ्यास मानवणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करता येते. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता तर वाढतेच व शिक्षण आनंददायी आणि सहज देखील होते.साहजिकच सर्व विद्यार्थ्यास सहज मानवणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करणे शक्य होते.या पद्धतीमुळे शिक्षणाची तीच उच्च गुणवत्ता, कमीत कमी किंमतीत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचते.परिणामी, “व्हर्च्युअल लर्निंग” कमीत कमी किंमतीत उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण जास्तीत जास्त उपलब्धतेसह देण्यास सक्षम ठरते.

अशा पद्धतीच्या “व्हर्च्युअल लर्निंग किंवा ई लर्निंग” मुळेप्रयत्नपूर्वक आणि व्यवस्थित नियोजनानंतर “Expert Teacher” ने दिलेल्या व्याख्यानाच्या प्रथम प्रतीच्या निर्माणानंतर, तीच उच्च गुणवत्ता सर्व सत्रात, सर्व वर्गातील प्रत्येक व्याख्यानाच्या वेळी निश्चितपणे देणे सहज शक्य आहे.

कुठेही आणि केव्हाही: ई लर्निंग पद्धतीत, जगातील सर्व विद्यार्थी कुठूनही आणि केव्हाही शिकू शकतात.

अनुरूप बदल करण्याची क्षमता: विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी किंवा पूर्व क्षमतेनुसार शिक्षण साहित्याच्या सादरीकरणात अनुरूप बदल करण्याची क्षमता ई लर्निंग पद्धतीत असते.

आणि म्हणूनच,या सर्व गोष्टींच भान ठेवून आम्हीव्हर्च्युअल लर्निंगसाठी लागणारेसुसज्ज तंत्रज्ञान आमच्या व्हर्च्युअल स्टुडीओच्या माध्यमातून तयार केलं आणि त्यातून आतापर्यंतआम्ही महाराष्ट्र राज्य शासनाबरोबर शासनाच्यावैद्यकीय, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, कौशल्यविकासयांसारख्याअनेकविभागांसाठी व्हर्च्युअल ट्रेनिंगमहाराष्ट्राच्याप्रत्येक खेड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहे.यासाठी फक्त तंत्रज्ञान उपलब्ध असून चालत नाही तर त्यासाठी प्रभावी आशय असणेही गरजेचे असते, अशा आशय निर्मितीचे कामही पार्थ करत आहे. वयोगट, भौगोलिक स्थिती, आकलन क्षमता, माध्यम या साऱ्यांचा विचार करून आणि अनुभवी शिक्षक, विषयतज्ज्ञ यांच्या सहाय्याने पार्थ प्रत्येक विषयाचा आशय तयार करुन ते व्हर्च्युअल ट्रेनिंगच्या माध्यमातून जगभरात पोहोचवत आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता, क्षमता आणि अभ्यासातील सातत्य यात वाढ होण्यासाठी आणि अभ्यासक्रमातील महत्वाच्या टिप्स आणि टेक्निक्स सांगण्यासाठी “पार्थ” ने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “SSC Excellence Lectures” हा डिजिटल उपक्रम सुरु केला आहे.

शाळा – क्लासमधील दहावीच्या वर्गातील नियमित अध्यापनाला पूरक आणि पोषक ठरणारा एक प्रभावशाली अभ्यासक्रम तज्ज्ञ् शिक्षकांनी तयार केला आहे. कमीत कमी वेळेत विद्यार्थ्यांना महत्वाची सूत्र व तंत्र आत्मसात करता यावी जेणेकरून त्यांची अभ्यासातील व परीक्षेतील कामगिरी उंचावण्यास मदत होईल, ही पार्थ SSC Excellence Lectures मागील चालना आहे. हाच यशाचा मंत्र आहे. तुमच्या शिक्षकांच्या अथक प्रयत्नात हा आमचा खारीचा वाटा आहे.

हा अभ्यासक्रम इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयांसाठी उपलब्ध आहे. या विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांचा सहभाग असेल. महत्वाचे म्हणजे हा अभ्यासक्रम पार्थच्या व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिकवला जाणार आहे. यामध्ये मुलांना अभ्यासक्रमातील महत्वाची सूत्र, तंत्र, आणि मंत्र सांगितले जाणार आहेत. आणि हा उपक्रम विद्यार्थी शाळेत किंवा क्लास मध्ये बसुन सुद्धा बघू शकणार आहेत.