तंत्र, मंत्र आणि सूत्र …
हाच १० वी चा खास मित्र
तुमचे मार्क वाढवा आता डिजिटल माध्यमातून

दहावीची चिंता सोडा, मार्क वाढीचे तंत्र जोडा

विद्यार्थ्यांची गुणवत्ता, क्षमता आणि अभ्यासातील सातत्य यात वाढ होण्यासाठी आणि अभ्यासक्रमातील महत्वाच्या टिप्स आणि टेक्निक्स सांगण्यासाठी “पार्थ” ने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “SSC Excellence Lectures” हा डिजिटल उपक्रम सुरु केला आहे.

शाळा – क्लासमधील दहावीच्या वर्गातील नियमित अध्यापनाला पूरक आणि पोषक ठरणारा एक प्रभावशाली अभ्यासक्रम तज्ज्ञ् शिक्षकांनी तयार केला आहे. कमीत कमी वेळेत विद्यार्थ्यांना महत्वाची सूत्र व तंत्र आत्मसात करता यावी जेणेकरून त्यांची अभ्यासातील व परीक्षेतील कामगिरी उंचावण्यास मदत होईल, ही पार्थ SSC Excellence Lectures मागील चालना आहे. हाच यशाचा मंत्र आहे. तुमच्या शिक्षकांच्या अथक प्रयत्नात हा आमचा खारीचा वाटा आहे.

हा अभ्यासक्रम इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयांसाठी उपलब्ध आहे. या विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांचा सहभाग असेल. महत्वाचे म्हणजे हा अभ्यासक्रम पार्थच्या व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिकवला जाणार आहे. यामध्ये मुलांना अभ्यासक्रमातील महत्वाची सूत्र, तंत्र, आणि मंत्र सांगितले जाणार आहेत. आणि हा उपक्रम विद्यार्थी शाळेत किंवा क्लास मध्ये बसुन सुद्धा बघू शकणार आहेत.

उद्देश

 • ईयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवणे
 • श्रवण व लिखाण क्षमता वाढवणे
 • तंत्र, मंत्र  आणि सूत्र ही त्रिसूत्री
 • कठीण पातळी असलेल्या प्रश्नांवर विशेष भर
 • परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे घटक समजावून सांगणे
 • भारतातील प्रत्येक कोपऱ्यापर्यंत गुणवत्ता पूर्ण शिक्षण डिजिटल माध्यमातून पोहचविणे

वैशिष्ट्य:

 • तंत्र, मंत्र आणि सूत्र १० वीचा खास मित्र.
 • प्रामुख्याने तीन विषयांचा समावेश इंग्रजी, गणित आणि विज्ञान
 • अनुभवी व तज्ञ शिक्षक
 • डिजिटल व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे थेट प्रक्षेपण
 • विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासहित निराकरण
 • प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र व्याख्यान
 • मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांसाठी
 • नॉलेज चेक

तज्ज्ञ शिक्षक

विषय: इंग्रजी
श्री. सचिन नरेश म्हात्रे
एम.ए.बी एस सी,बी.एड

अनुभव :
सहाय्यक शिक्षक : दोसिबाई जीजीऑय हायस्कूल जोगेश्वरी (पूर्व), मुंबई.

 • एस.एस.सी. बोर्डाचे प्रमुख स्त्रोत अधिकारी.
 • ब्रिटीश कौन्सिल ईलिस प्रोजेक्टचे मेंटॉर.
 • सर्व शिक्षा अभियानाचा स्पोकन इंग्लिश अभ्यासक्रमात संसाधन व्यक्ती.
 • इंग्रजी विषयांच्या शिक्षकांसाठी आरएमएसएच्या चॅझ मॉडरेटर.
 • एबीपी माझावर “अभ्यास माझा दहावीचा” यात सहभाग.

इंग्रजी विषयासाठी मुद्दे:
अभ्यासाचे तंत्र :
१) इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची अचूक व योग्य उत्तरे लिहिण्याची सोपी तंत्रे शिकवली जातील, उत्तरपत्रिका लिहिताना उपयोग होईल.
२) Language Study या वीस गुणावर आधारित सोप्या प्रश्नपत्रिकांबद्दल जास्तीत जास्त माहिती दिली जाईल व हे सोडविताना नेमके कोणते तंत्र वापरावे याचे अचूक मार्गदर्शन.
३) पाठातील उतारे, कविता, आणि पाठेतर उतारे नेमके कोणत्या पद्धतीने सोडवावेत, याचे तंत्र समजून दिले जाईल.
४) लेखन कौशल्य  विकसित करणे.
५) भाषांतर व कौशल्य विकासावर जास्तीत जास्त भर.
६) शालांत परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळण्यासाठी महत्वाच्या सूचना.

विषय: गणित
श्री.संदीप गीध.,
बी.एस.सी,एम.ए,एम.एड,
करिअर मास्टर

अनुभव :

 • संदीप गीध हे NLP life चे कोच आहेत.
 • गेल्या 28 वर्षांपासून त्यांनी तीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
 • शाळा आणि महाविद्यालयामध्येही करिअर मार्गदर्शन
 • गणित आणि विज्ञान या विषयांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
 • संदीप गीध हे ALP &Mathematics राज्य पातळीवरील Master Trainer आहे.

गणित विषयासाठी मुद्दे:

 1. भूमिती २) बीजगणित ३) इ.९ वि पूर्वज्ञान ४) गणित प्रात्याक्षिके ५) भूमिती प्रश्नसंच 6) बीजगणित प्रश्नसंच ७) आव्हात्नात्मक प्रश्न

विषय: विज्ञान
श्री. विलास नारायण परब
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदविका बी.ए. बी.एड,
शिक्षण व्यवस्थापन पदविका

अनुभव :

 • 2001 पासून बालमोहन विद्यामंदिर येथे विज्ञान विषयाचे अध्यापन.
 • IIT मुंबई द्वारे तज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त
 • ब्रिटीश कॉन्सीलद्वारे इंग्रजीचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त.
 • National institute of Securities market संस्थे द्वारे Money Smart अध्यापक म्हणून नियुक्त.
 • अध्ययन संस्थेद्वारे विज्ञान आणि गणित विषयाचा प्रचार आणि प्रसार.
 • बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळात गणित विषयासाठी कार्यरत.

विज्ञान विषयासाठी मुद्दे.

 • नवीन अभ्यासक्रमानुसार विज्ञान शिकवणे आणि शिकणे हा आमूलाग्र बदल अपेक्षित आहे.
 • विज्ञान विषय म्हणून शिकवताना यापुढे सर्व संबोध नीट स्पष्ट करून दिले जातील.
 • प्रश्नाचा स्वरूपानुसार शिकवल्या जाणाऱ्या भागावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील

भर अपेक्षित:

 1. संबोध घटना सखोल समजून घेणे.
 2. सबोधांवर आधारित कृतियुक्त प्रश्नांचा सराव.
 3. प्रश्नांच्या विविध प्रकारानुसार चर्चा.