Lecture No. Date Day Time Medium Subject Topic Name

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे.जिथे शिक्षक सक्षम नाही, मुलांची संख्या खुप आहे किंवा शिक्षकांची योग्य संख्येत उपलब्धता नाही आणि जेथे विद्यार्थी शिक्षकांशिवाय स्वतंत्रपणे शिकूइच्छितो अशा परिस्थितीत व्हर्च्युअल लर्निंग म्हणजेच आभासी शिक्षण खूप मदतीचे ठरते. या माध्यमामुळे आपल्या गरजेनुरूप दृक्श्राव्य कार्यक्रमाद्वारे स्वशिक्षण करणे सहज शक्य होते.

पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत, शिक्षक शिकवीत असलेल्या स्थळी आणि वेळीच, विद्यार्थ्याने उपस्थित असणे आवश्यक असते. कुठल्याही कारणामुळे, जर विद्यार्थी त्याच स्थळी आणि वेळी उपस्थित राहू शकत नसेल, तर तो शिक्षण घेऊ शकत नाही. उपस्थित विद्यार्थ्याची सुद्धा त्या वेळी शिक्षण घेण्यास पोषक मानसिकता नसेल, तरीदेखील तो शिक्षण घेण्यास मुकतो. व्हर्च्युअल लर्निंगमुळे स्थळ काळाची ही बंधने गळून पडतात. अशा पद्धतीच्या व्हर्च्युअल लर्निंग किंवा ई लर्निंग मुळे प्रत्येक विद्यार्थी, त्याला सोयीच्या असलेल्या स्थळी आणि वेळीशिकू शकतो. व्हर्च्युअल लर्निंगद्वारे विद्यार्थ्याला दूरवरच्या शिक्षकांशी, तंज्ज्ञांशी थेट संपर्क साधता येतो. या माध्यमातून परस्पर संवादातून शंकांचे निरसन करता येते, विषय समजावून घेता येतात.आतापर्यंत शिकू शकत नसलेल्या खूप मोठ्या विद्यार्थी संख्येस शिक्षणव्यवस्थेत आणण्यास ही “स्थळ काळाची लवचिकता” आवश्यक व सक्षम आहे. साहजिकच, “व्हर्च्युअल लर्निंग किंवा ई लर्निंग” मुळे शिक्षणाची उपलब्धता भरपूर वाढली आहे.

ई लर्निंग मुळेस्थळ, काळाची बंधने पाळणे शक्य नसणारा विद्यार्थी देखील शिक्षणव्यवस्थेत येऊ शकतो, तसेच कमी आणि उच्च क्षमतेच्या विद्यार्थ्यास मानवणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करता येते. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता तर वाढतेच व शिक्षण आनंददायी आणि सहज देखील होते.साहजिकच सर्व विद्यार्थ्यास सहज मानवणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करणे शक्य होते.या पद्धतीमुळे शिक्षणाची तीच उच्च गुणवत्ता, कमीत कमी किंमतीत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचते.परिणामी, “व्हर्च्युअल लर्निंग” कमीत कमी किंमतीत उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण जास्तीत जास्त उपलब्धतेसह देण्यास सक्षम ठरते.

अशा पद्धतीच्या “व्हर्च्युअल लर्निंग किंवा ई लर्निंग” मुळेप्रयत्नपूर्वक आणि व्यवस्थित नियोजनानंतर “Expert Teacher” ने दिलेल्या व्याख्यानाच्या प्रथम प्रतीच्या निर्माणानंतर, तीच उच्च गुणवत्ता सर्व सत्रात, सर्व वर्गातील प्रत्येक व्याख्यानाच्या वेळी निश्चितपणे देणे सहज शक्य आहे.

कुठेही आणि केव्हाही: ई लर्निंग पद्धतीत, जगातील सर्व विद्यार्थी कुठूनही आणि केव्हाही शिकू शकतात.

अनुरूप बदल करण्याची क्षमता: विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी किंवा पूर्व क्षमतेनुसार शिक्षण साहित्याच्या सादरीकरणात अनुरूप बदल करण्याची क्षमता ई लर्निंग पद्धतीत असते.

आणि म्हणूनच,या सर्व गोष्टींच भान ठेवून आम्हीव्हर्च्युअल लर्निंगसाठी लागणारेसुसज्ज तंत्रज्ञान आमच्या व्हर्च्युअल स्टुडीओच्या माध्यमातून तयार केलं आणि त्यातून आतापर्यंतआम्ही महाराष्ट्र राज्य शासनाबरोबर शासनाच्यावैद्यकीय, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, कौशल्यविकासयांसारख्याअनेकविभागांसाठी व्हर्च्युअल ट्रेनिंगमहाराष्ट्राच्याप्रत्येक खेड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहे.यासाठी फक्त तंत्रज्ञान उपलब्ध असून चालत नाही तर त्यासाठी प्रभावी आशय असणेही गरजेचे असते, अशा आशय निर्मितीचे कामही पार्थ करत आहे. वयोगट, भौगोलिक स्थिती, आकलन क्षमता, माध्यम या साऱ्यांचा विचार करून आणि अनुभवी शिक्षक, विषयतज्ज्ञ यांच्या सहाय्याने पार्थ प्रत्येक विषयाचा आशय तयार करुन ते व्हर्च्युअल ट्रेनिंगच्या माध्यमातून जगभरात पोहोचवत आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता, क्षमता आणि अभ्यासातील सातत्य यात वाढ होण्यासाठी आणि अभ्यासक्रमातील महत्वाच्या टिप्स आणि टेक्निक्स सांगण्यासाठी “पार्थ” ने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “SSC Excellence Lectures” हा डिजिटल उपक्रम सुरु केला आहे.

शाळा – क्लासमधील दहावीच्या वर्गातील नियमित अध्यापनाला पूरक आणि पोषक ठरणारा एक प्रभावशाली अभ्यासक्रम तज्ज्ञ् शिक्षकांनी तयार केला आहे. कमीत कमी वेळेत विद्यार्थ्यांना महत्वाची सूत्र व तंत्र आत्मसात करता यावी जेणेकरून त्यांची अभ्यासातील व परीक्षेतील कामगिरी उंचावण्यास मदत होईल, ही पार्थ SSC Excellence Lectures मागील चालना आहे. हाच यशाचा मंत्र आहे. तुमच्या शिक्षकांच्या अथक प्रयत्नात हा आमचा खारीचा वाटा आहे.

हा अभ्यासक्रम इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयांसाठी उपलब्ध आहे. या विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांचा सहभाग असेल. महत्वाचे म्हणजे हा अभ्यासक्रम पार्थच्या व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिकवला जाणार आहे. यामध्ये मुलांना अभ्यासक्रमातील महत्वाची सूत्र, तंत्र, आणि मंत्र सांगितले जाणार आहेत. आणि हा उपक्रम विद्यार्थी शाळेत किंवा क्लास मध्ये बसुन सुद्धा बघू शकणार आहेत.

तंत्र, मंत्र आणि सूत्र … हाच १० वी चा खास मित्र
दहावीची चिंता सोडा, मार्क वाढीचे तंत्र जोडा

 • ईयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवणे
 • श्रवण व लिखाण क्षमता वाढवणे
 • तंत्र, मंत्र आणि सूत्र ही त्रिसूत्री
 • कठीण पातळी असलेल्या प्रश्नांवर विशेष भर
 • परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे घटक समजावून सांगणे
 • भारतातील प्रत्येक कोपऱ्यापर्यंत गुणवत्ता पूर्ण शिक्षण डिजिटल माध्यमातून पोहचविणे
 • तंत्र, मंत्र आणि सूत्र १० वीचा खास मित्र
 • प्रामुख्याने तीन विषयांचा समावेश इंग्रजी, गणित आणि विज्ञान
 • अनुभवी व तज्ञ शिक्षक
 • डिजिटल व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे थेट प्रक्षेपण
 • विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासहित निराकरण
 • प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र व्याख्यान
 • मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांसाठी
 • नॉलेज चेक

विषय: इंग्रजी
श्री. सचिन नरेश म्हात्रे
एम.ए.बी एस सी,बी.एड

अनुभव :
सहाय्यक शिक्षक : दोसिबाई जीजीऑय हायस्कूल जोगेश्वरी (पूर्व), मुंबई.

 • एस.एस.सी. बोर्डाचे प्रमुख स्त्रोत अधिकारी.
 • ब्रिटीश कौन्सिल ईलिस प्रोजेक्टचे मेंटॉर.
 • सर्व शिक्षा अभियानाचा स्पोकन इंग्लिश अभ्यासक्रमात संसाधन व्यक्ती.
 • इंग्रजी विषयांच्या शिक्षकांसाठी आरएमएसएच्या चॅझ मॉडरेटर.
 • एबीपी माझावर “अभ्यास माझा दहावीचा” यात सहभाग.

इंग्रजी विषयासाठी मुद्दे:
अभ्यासाचे तंत्र :
१) इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची अचूक व योग्य उत्तरे लिहिण्याची सोपी तंत्रे शिकवली जातील, उत्तरपत्रिका लिहिताना उपयोग होईल.
२) Language Study या वीस गुणावर आधारित सोप्या प्रश्नपत्रिकांबद्दल जास्तीत जास्त माहिती दिली जाईल व हे सोडविताना नेमके कोणते तंत्र वापरावे याचे अचूक मार्गदर्शन.
३) पाठातील उतारे, कविता, आणि पाठेतर उतारे नेमके कोणत्या पद्धतीने सोडवावेत, याचे तंत्र समजून दिले जाईल.
४) लेखन कौशल्य  विकसित करणे.
५) भाषांतर व कौशल्य विकासावर जास्तीत जास्त भर.
६) शालांत परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळण्यासाठी महत्वाच्या सूचना.

विषय: गणित
श्री.संदीप गीध.,
बी.एस.सी,एम.ए,एम.एड,
करिअर मास्टर

अनुभव :

 • संदीप गीध हे NLP life चे कोच आहेत.
 • गेल्या 28 वर्षांपासून त्यांनी तीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
 • शाळा आणि महाविद्यालयामध्येही करिअर मार्गदर्शन
 • गणित आणि विज्ञान या विषयांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
 • संदीप गीध हे ALP &Mathematics राज्य पातळीवरील Master Trainer आहे.

गणित विषयासाठी मुद्दे:

 1. भूमिती २) बीजगणित ३) इ.९ वि पूर्वज्ञान ४) गणित प्रात्याक्षिके ५) भूमिती प्रश्नसंच 6) बीजगणित प्रश्नसंच ७) आव्हात्नात्मक प्रश्न

विषय: विज्ञान
श्री. विलास नारायण परब
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदविका बी.ए. बी.एड,
शिक्षण व्यवस्थापन पदविका

अनुभव :

 • 2001 पासून बालमोहन विद्यामंदिर येथे विज्ञान विषयाचे अध्यापन.
 • IIT मुंबई द्वारे तज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त
 • ब्रिटीश कॉन्सीलद्वारे इंग्रजीचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त.
 • National institute of Securities market संस्थे द्वारे Money Smart अध्यापक म्हणून नियुक्त.
 • अध्ययन संस्थेद्वारे विज्ञान आणि गणित विषयाचा प्रचार आणि प्रसार.
 • बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळात गणित विषयासाठी कार्यरत.

विज्ञान विषयासाठी मुद्दे.

 • नवीन अभ्यासक्रमानुसार विज्ञान शिकवणे आणि शिकणे हा आमूलाग्र बदल अपेक्षित आहे.
 • विज्ञान विषय म्हणून शिकवताना यापुढे सर्व संबोध नीट स्पष्ट करून दिले जातील.
 • प्रश्नाचा स्वरूपानुसार शिकवल्या जाणाऱ्या भागावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील

भर अपेक्षित:

 1. संबोध घटना सखोल समजून घेणे.
 2. सबोधांवर आधारित कृतियुक्त प्रश्नांचा सराव.
 3. प्रश्नांच्या विविध प्रकारानुसार चर्चा.
 • 10th लाईव्ह म्हणजे काय ?

  [ ]

  L- live, I –interactive, V-virtual, E-education

 • नोंदणी करण्यासाठी किती शुल्क भरावे लागेल.?

  [ ]

  नोंदणी करण्यासाठी शुल्क भरावे लागणार नाही

 • नोंदणी कालावधी किती आहे ?

  [ ]

  1वर्ष

 • लेक्चर कोणत्या माध्यमासाठी उपलब्ध आहे ?

  [ ]

  मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी.

 • या लेक्चर साठी किती शुल्क भरावे लागेल ?

  [ ]

  प्रति तास रु.99, वार्षिक शुल्क 6534 + १८% GST अतिरिक्त

 • नोंदणी पूर्ण करण्यासाठी कोणती तांत्रिक पात्रता आवश्यक आहे ?

  [ ]

  • किमान 1 संगणक
  • प्रोजेक्टर
  • किमान 1 MBPS वेग आवश्यक
  • दोन स्पिकर्स
 • एक लेक्चर किती तासांचे असेल?

  [ ]

  दोन तास

 • शुल्क कसे भरावे लागेल

  [ ]

  संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही शुल्क भरू शकता

 • लाइव्ह लेक्चर न बघितल्यास त्याचे पुन्हा प्रक्षेपण कधी होईल?

  [ ]

  उर्वरित लेक्चर्स LMS द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे.

 • या लेक्चर मध्ये कोणत्या विषयांचा समावेश असणार आहेत ?

  [ ]

  मराठी, विज्ञान आणि इंग्रजी

 • एका विषयासाठी हा प्लॅन उपलब्ध आहे का ?

  [ ]

  नाही

 • लेक्चर ऑनलाईन असेल तर ते कोठे बघता येईल.

  [ ]

  शाळा, क्लास आणि सेंटर

 • लेक्चर्स कोणत्या डिव्हाईस मध्ये बघू शकतो?

  [ ]

  Computer, Laptop, Mobile

 • लेक्चर मध्ये शिकवलेल्या काही टिप्स किंवा काही सूत्रे न समजल्यास त्याचं निरसन कसे केले जाईल ?

  [ ]

  तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला आमच्या https://parthliveglobal.wordpress.com/ या ब्लॉगवर विचारू शकता. त्याचं स्पष्टीकरणासहित निरसन हे आमच्या ब्लॉग द्वारे दिले जाईल.

 • एका वर्षांमध्ये किती लेक्चरचा समावेश असेल ?

  [ ]

  एका माध्यमासाठी ३३ लेक्चर, 66 तास

 • मला अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्या संकेत स्थळाची लिंक आम्हाला मिळू शकते का?

  [ ]

 • एकत्रित फी भरल्यास काही सूट दिली जाईल का ?

  [ ]

  यामध्ये कोणतीही सूट नाही.

 • Installment सुविधा उपलब्ध आहे का?

  [ ]

  नाही.

 • अधिक माहितीसाठी कोणता दूरध्वनी क्रमांक आहे?

  [ ]

  02227643006/3007/3009
  WhatsApp: 8384858685
  Email: plgssc@parthinfo.com